Eknath Khadse to join NCP | राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याचं खातं एकनाथ खडसेंना : सूत्र
40 वर्ष पक्षात राहिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला मोठा धक्का दिला. एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केला असून 23 ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मंत्री राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे.
एकनाथ खडसे यांनी भाजप पक्ष सोडला असल्याची माहिती मला मिळाली आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येताना खडसे यांनी कोणतीही अट ठेवली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्त्वात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली," असंही पाटील यांनी नमूद केलं.