राज्यातील स्थितीची माहिती राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिली पाहिजे : सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाजप नेते सुधीर मनुगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रपती राजवट लागू करावी ही आमची मागणी नाही. मात्र राज्यपालांनी सध्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप करावा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. राज्यपाल महोदयांनी राज्यातल्या सत्य परिस्थितीवर आधारित घटनेत नमून केलेल्या तरतुदींच्या आधारे एक अहवाल राष्ट्रपतींना सादर करावा. मुख्यमंत्री आणि मुख्यसचिव यांनीही सत्य कथन असलेला अहवाल लिहावा असं सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola