Mansukh Hiran Death Case | मनसुख हिरण यांच्या हत्येचा उलगडा NIA ने कसा केला? आरोपींचा शोध कसा लावला?

मुंबई : मनसुख हिरण हत्या प्रकरणाचा तपास करणार्‍या महाराष्ट्र एटीएसने दोन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये विनायक शिंदे नावाच्या निलंबित पोलिस हवालदाराला आणि नरेश गोरे नावाच्या क्रिकेट बुकीचा समावेश आहे. टेक्नोलॉजीची मदत घेऊन एटीएसने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

एपीआय सचिन वाझे हे टेक्निकल एक्सपर्ट मानले जातात. परंतु या प्रकरणात, महाराष्ट्र एटीएसने देखील टेक्नोलॉजीच मदत घेतली आणि आरोपींनी अटक केली. सूत्रांनी सांगितले की, 4 मार्च रोजी रात्री  8 ते साडेआठ वाजेपर्यंत मनसुखला अखेरचा व्हॉट्सअॅप कॉल आला, जो सापडणे सोपे नव्हते. यामुळे एटीएसने महाराष्ट्रातील सर्व बड्या टेक्नोलॉजी एक्सपर्ट्ची मदत घेतली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola