Sudhakar Badgujar on BJP : वेट अँड वॉचची भूमिका, सुधाकर बडगुजर 'माझा'वर EXCLUSIVE
Sudhakar Badgujar on BJP : वेट अँड वॉचची भूमिका, सुधाकर बडगुजर 'माझा'वर EXCLUSIVE
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्यावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.त्यानंतर नाशिकच्या राजकारण मोठी खळबळ उडाली. त्यानंतर त्यांना भाजप पक्षाने आपल्या पक्षात येण्यासाठी खुली ऑफर दिली आहे. ते शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झाल्यानंतर आता भाजपमध्ये जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान पक्षांतरांच्या चर्चेवरती आज सुधाकर बडगुजर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
सुधाकर बडगुजर यांनी पक्षांतरांची भूमिका मांडताना म्हटलं की, मी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. मी कार्यकर्ते आणि समर्थकांशी बोलून निर्णय घेईल. भाजप वरीष्ठ पातळीवर काय हालचाली चालू आहेत ते माहिती नाही. मी पक्षात प्रवेश करताना कोणत्याही अटी शर्ती लावणार नाही. सीमा हिरे यांच्याविरोधात मी निवडणूक लढवली होती, त्यामुळे त्यांचा विरोध स्वाभाविक आहे. सर्व पक्षातून बोलवणं आहे, कुठं जायचं ते ठरवू, येणाऱ्या काळात पुढची दिशा ठरवू. सोशल मीडियावर काही -काही आरोप प्रत्यारोप केले जातात, त्याबद्दल फार माहिती नाही, असंही बडगुजर यांनी म्हटलं आहे.