Bala Nandgaonkar : भावांना एकत्र आणेन असा बाळासाहेबांना शब्द देणारे नांदगावकर काय म्हणाले?
Bala Nandgaonkar : भावांना एकत्र आणेन असा बाळासाहेबांना शब्द देणारे नांदगावकर काय म्हणाले?
Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सध्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान काल माध्यमांशी बोलताना जे जनतेच्या मनात आहे, तेच होईल. आता थेट बातमीच देऊ, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं. त्यामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांदरम्यान आज राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यानंतर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी माध्यामांशी संवाद साधत या बैठकीबाबत महत्वाची माहिती दिली. वरळीला मेळावा झाला होता, त्यात राज ठाकरे यांनी समितीबद्दल सांगितलं होत. माझ्याकडे गटाध्यक्ष केंद्रीय समिती होती. आमच्या टीममध्ये दीडशे ते पावणेदोनशे सदस्य होते. त्याचा अहवाल आम्ही दिला. ग्राउंड लेव्हलवर अभ्यास करून हा अहवाल दिला आहे. 227 मतदारसंघात जाऊन हा अहवाल तयार केला, असं बाळा नांदगावकरांनी सांगितले. तसेच 13 जूनला आता बैठक होणार आहे. हा पहिला राऊंड आहे. बरेच सकारात्मक मतदारसंघ मिळाले आहेत. दुसऱ्या ग्राउंडमध्ये लोकांसोबत चर्चा करून त्यानंतर सर्व काही समोर येईल, असं बाळा नांदगावकरांनी सांगितले.