MAHA LOCAL POLLS: 'विरोधकांना 100% हरण्याची भीती', माजी मंत्री Subhash Deshmukh यांचा टोला
Continues below advertisement
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली आहे. 'निवडणुकीत शंभर टक्के हरण्याच्या भीतीमुळे विरोधी पक्ष मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा बहाणा करून निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे', असा थेट आरोप देशमुख यांनी केला. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून, त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, असेही ते म्हणाले. मतदार याद्यांमधील दुबार नावे किंवा चुकांचा विषय हा गेल्या पन्नास वर्षांपासूनचा असून ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement