Special Report : साताऱ्यात शाळा गाठण्यासाठी विद्यार्थ्यांचा संघर्ष, जीव मुठीत घेऊन प्रवास
Special Report : एकीकडे डिजिटल इंडियाच्या चर्चा जोरात रंगत असतात, त्याच वेळी महाराष्ट्रात एक असंही गाव आहे जिथे जीवघेणा प्रवास करत विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागते. एकीकडे सर्वपक्षीय नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यात मश्गूल आहे... मात्र जनतेला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय याचं कुणालाच सोयरसुतक नाही.. जनतेचे कैवारी म्हणवणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांनी जरा इकडे लक्ष द्यावं, कारण हे खरे जनतेचे प्रश्न आहेत, ही त्यांची वेदना आहे.