Yavatmal : शिकाऊ डॉक्टर अशोक पालच्या हत्येनंतर विद्यार्थी आक्रमक, शिवसेना नेत्याची आंदोलकांना धमकी!

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ डॉक्टर अशोक पालच्या हत्येनंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. डॉ. अशोकच्या मारेकऱ्यांना अटक करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलंय. याच आंदोलकांना शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष ढवळे यांनी धमकावल्याचा व्हिडीओ समोर आलाय. आंदोलक विद्यार्थी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांचे अनुभव सांगत होते. त्याचवेळी तिथे असणाऱ्या संतोष ढवळे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत बाचाबाची झाली. गेटबाहेर असणाऱ्यांना बोलावू का अशी धमकीच त्यांनी दिल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यानंतर विद्यार्थ्यांनी संतोष ढवळे यांच्या अटकेची मागणी केली.  आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी संतोष ढवळे यांना ताब्यात घेतल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलीय. दरम्यान आमदार संजय राठोड यांनी संतोष ढवळे यांच्या वर्तनाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola