Student Andolan | लातूरमध्ये 36 तासांपासून कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन | ABP Majha

लातूरमधल्या कृषी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आज दुसऱ्या दिवसीही सुरु आहे. स्थानिक प्रशासनासोबत विद्यार्थ्यांचे काही वाद आहेत, हे वाद विकोपाला गेल्याने विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. तक्रारी थेट कुलगुरुंनाच सांगणार अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. परभणी कृषी विद्यापीठातून आलेल्या शिष्ठमंडळाने विद्यार्थ्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थ्यांनी नकार दिला. कुलगुरु जोपर्यंत समोर येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं विद्यार्थ्यांनी म्हटलंय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola