Beed Protest | सीएए, एनआरसीविरोधात बीडमध्ये एल्गार | ABP Majha
बीडच्या परळीमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. इंडिया अगेन्स्ट सीएए आणि एनआरसीविरोधी समितीच्या वतीनं बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांनी सहभागी घेतला. आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. कायदा मागे घेतला जात नाही तोवर आंदोलनही थांबणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतलीय. दुसरीकडे पुण्यातील घोरपडी पेढेत सीएए आणि एनआरसी विरोधात मुंडन आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकार म्हणणं ऐकत नसल्यानं मुंडन आंदोलन करावं लागत असल्याची प्रतिक्रिया आंदोलकांनी दिलीय.