Yavatmal Masanjogi | स्मशानभूमीत 'मरणाच्या वाटेवरच जगणं'; लॉकडाऊनमुळे मसणजोगी समाजावर उपासमारीची वेळ
Continues below advertisement
मनुष्याच्या जीवनाचे अंतिम सत्य म्हणजे मृत्यू आणि मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावेळी स्मशानभूमी प्रेताचा सांभाळ करून सरण रचून देणारा आणि मृत व्यक्तीची राखड उचलून देऊन स्मशानभूमीतुन बाहेर जाणाऱ्या व्यक्तीसमोर शंख आणि टनमन वाजवून अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांकडे दान मागणारे 'मसणजोगी' आज उपेक्षितांचे आणि लॉकडाऊनपासून हलाखीचे जीवन जगत आहे. मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जातात त्याच स्मशानभूमीत कुटुंबासह राहणार आणि स्मशानभूमीची राखण करणारा मसणजोगीला कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊन काळात कुणी भिक्षा सुध्दा देत नसल्याने ते अडचणीत सापडले आहेत.
Continues below advertisement