Lockdown : सिंधुदुर्गमध्ये 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन, औषधांची दुकानं आणि दवाखाने सुरू राहणार
Continues below advertisement
सिंधुदुर्गात कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सिंधुदुर्गात आज रात्री १२ वाजल्यापासून १५ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यासंदर्भातील जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत. जिल्ह्यात ६ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला असून या काळात सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत किराणा, बेकरी, भाजीपाला, दूध व्यावसायिकांनी होम डिलिव्हरी करायची मुभा देण्यात आली आहे. कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधित दुकानांची सेवा सकाळी ७ ते सायंकाळी ५ या कालावधीतच सेवा देण्यास परवानगी राहील.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Konkan Lockdown Latest News Lockdown In Maharashtra Sindhudurg Maharashtra Lockdown