Nagpur Pet Dogs : नागपुरातील रस्त्यावर कुत्र्यांवर खाऊ घालाल तर...मालकांसाठी मार्गदर्शक सूचना
सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यांवर श्वानांना खाऊ घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. महानगरपालिकेने या संदर्भात नवीन सूचना जारी केल्या आहेत. यानुसार, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांबद्दल त्यांच्या मालकांनी योग्य ती प्रतिबंधात्मक काळजी घेणे आवश्यक आहे. कुत्र्यांच्या तोंडाला जाळी बांधावी जेणेकरून ते दुसऱ्याला चावून जखमी करणार नाहीत. तसेच, कुत्र्यांच्या पट्ट्यावर मालकाचे नाव आणि पत्ता नमूद करणे बंधनकारक आहे. सार्वजनिक ठिकाणी कुत्र्याच्या गळ्यात पट्टा नसल्यास त्याला मोकाट श्वान समजून महानगरपालिकेकडून कारवाई केली जाईल. मोकाट कुत्र्यांना महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणीच खाऊ घालावे. इतरत्र खाऊ घातल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. मालकांनी त्यांच्या श्वानांचे नियमित लसीकरण आणि निर्मिळीकरण करावे. यासाठी महापालिकेची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.