Vaccine Story : लसीकरणासाठी ग्रामसेविकेचं अनोखं प्रबोधन, लोककला आणि गाण्यांच्या माध्यमातून जनजागृती

Continues below advertisement

भारताने नुकताच कोरोना लसीकरणाचा शंभर कोटींचा आकडा गाठला आहे. देशात या लसीकरण मोहिमेला अनेकांचा मोठा हातभार लागला असून जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील देवकन्या जवजे या ग्रामसेविका त्यातीलच एक आहे. देवकन्या यांनी शेवता आणि बानेगाव ग्रामपंचायतीमध्ये आपल्या प्रबोधनातून लसीकरणाचा टक्का वाढवला हाता. 20 दिवसांपूर्वी अवघ्या 35 लोकांचे लसीकरण झालेल्या बानेगावात आता 80 टक्के लसीकरण झालं आहे तर शेवता गावात हे लसीकरण 50 टक्क्यांवर पोहोचलं आहे. या गावात त्यांनी लसीकरणाबाबत विविध लोककला तसंच गाण्यांच्या माध्यमातून लोकांच्या मनातील कोरोना लसीकरणाच्या शंकांचं निरासरण केलं आणि सोबतच गावातील निरुत्साही लोकांना लसीकरणाचं महत्त्व पटवून दिलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram