Ashish Shelar यांच्या वक्तव्यावर आक्षेप, राज्य महिला आयोगाकडून दखल ABP Majha
Continues below advertisement
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांबद्दल भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्याची राज्य महिला आयोगानं दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वरळीतील सिलेंडर स्फोटानंतर महापौरांवर आरोप करताना आशिष शेलारांनी टीका करताना काही आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय वादात आता महिला आयोगानंही उडी घेतलीय.
Continues below advertisement