Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 7 डिसेंबर 2021 : मंगळवार : एबीपी माझा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App1. मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण, राज्यातला बाधितांचा आकडा 10 वर, रुग्णसंख्या वाढत असली तरी तात्काळ निर्बंध लावणार नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती
2. कामावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारीत वेतनवाढीनुसार पगार होणार, तर संपकऱ्यांवर मेस्मातंर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा
3.ओबीसी राजकीय आरक्षणावरून ठाकरे सरकारसमोर मोठा पेच, इम्पेरिकल डेटासाठी दिरंगाई केल्याचा विरोधकांचा ठपका
4. शिवसेना काँग्रेसमध्ये वाढती जवळीक, संजय राऊत आज राहुल गांधींना भेटणार, उत्तर प्रदेशसह आगामी निवडणुकांच्या तोंडावर महत्त्वाची भेट
5. शिक्षिकेसोबत शारिरीक संबंध ठेवून व्हिडीओ बनवणाऱ्या विद्यार्थ्याला बेड्या, पतीसमोर भांडाफोड करण्याची धमकी देऊन 8 लाख उकळले
6. बुलढाण्यातील खामगावात चौथ्या दिवशीही वाघाची दहशत कायम; प्रशासन अलर्ट मोडवर, तर वनविभागाकडून शोधमोहीम सुरु
7. पाकिस्तानी महिलेने सीमेवर बाळाला दिला जन्म, 70 दिवसांपासून अटारी सीमेवर वास्तव्य करणाऱ्या जोडप्याकडून नवजात बाळाला बॉर्डर नाव
8. अमेरिकेच्या इशाऱ्याला बाजूला ठेवत भारत आणि रशियामध्ये 28 करारांवर स्वाक्षऱ्या, दहशतवादाविरोधात एकत्र लढण्याचा निर्धार
9. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ; सुकेश चंद्रशेखरच्या यांच्या आर्थिक घोटाळा प्रकरणी उद्या चौकशी
10. टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेचा दौरा होणारच, आयसीसीकडून सुधारित वेळापत्रक जाहीर