Coronavirusमुळे राज्यातील 3 महापालिकांवर प्रशासक नेमणार; राज्य निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र

सध्या जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच देशातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या महाराष्ट्रात आहे. देशासह राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे राज्यातील अनेक भागांतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेचा समावेश आहे. या तिनही महानगरपालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता या तिनही मोठ्या महानगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola