Mumbai police | 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरातच थांबण्याचे निर्देश
Continues below advertisement
कोरोना व्हायरसशी फ्रण्ट लाईनवर लढणाऱ्या पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पोलीस दलात 55 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांना घरात थांबण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचं वय 55 वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी बंदोबस्तात सहभागी होऊ नये, असं मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.
Continues below advertisement