राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात वाढ, 17 टक्क्यांवरून 28 टक्के वाढवण्याचा निर्णय
राज्य सरकारनं शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ केलीए. महागाई भत्ता 17 टक्के वरून 28 टक्के वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 1 ऑक्टोबर 2021 पासून वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंदाजे 15 ते 20 हजार आणि कर्मचाऱ्यांना दरमहा 2 ते 5 हजारांची वाढ मिळणार आहे. त्यामुळे दसरा, दिवाळीआधीच राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना ठाकरे सरकारनं गोड बातमी दिली आहे.
Tags :
State Government