Monsoon Update : परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, विजा चमकत असताना बाहेर पडू नका!
पालघर जिल्ह्यातल्या विविध भागामध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. पालघर, माहीम, बोईसर,डहाणू, जव्हार भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. परतीच्या या पावसामुळे पिकून आलेल्या हळव्या भातशेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.