CBI Mumbai : सीताराम कुंटे-संजय पांडे यांना CBI ने बजावलेल्या समन्साला राज्य सरकारचे आव्हान
Continues below advertisement
पुन्हा एकदा सीबीआय आणि ठाकरे सरकार वाद रंगण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावला होता. मात्र या दोघांनीही सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिल्याची माहिती होती. आता मात्र राज्य सरकारने CBI ने बजावलेल्या समन्साला आव्हान दिल आहे आणि या बाबत मुंबई उच्च न्यायालयात 20 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.
Continues below advertisement