कर्नाटकातून महाराष्ट्राला होणारा ऑक्सिजन पुरवठा तातडीने सुरु करा : सतेज पाटील
Continues below advertisement
कर्नाटकातून महाराष्ट्राला होणारा ऑक्सिजन पुरवठा तातडीने सुरु करा अशी मागणी राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची केंद्र सरकारकडे केली आहे. कर्नाटकच्या बेल्लारीतून येणारा 50 टन ऑक्सिजन खंडित झाला आहे. याचा परिणाम कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांवर झाला आहे. त्यामुळे कोल्हापुरातून गोव्याला दिला जाणारा 10 टन ऑक्सिजन बेल्लारीतून द्या, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
Continues below advertisement