Starlink Internet : Elon Musk यांची स्टारलिंक इंटरनेट सेवा लवकरच भारतात, JIO ला धक्का?
टेस्ला कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाल्यानंतर आता इलन मस्क यांची स्टारलिंक इंटरनेट सेवा लवकरच भारतात सुरू होणार आहे. स्टारलिंकला ग्राहक जोडताना आधार आणि केवायसी (KYC) करण्याची परवानगी मिळाली आहे. यामुळे स्टारलिंकचे कामकाज पेपरलेस होणार आहे. "स्टारलिंकला ग्राहक जोडताना आधार, केवायसीसी करण्याची परवानगी मिळाली असून स्टारलिंकचे कामकाज पेपरलेस होणार आहे," असे या संदर्भात स्पष्ट झाले आहे. युआयडीएआय (UIDAI) सोबतच्या करारामुळे भविष्यात मोठी मदत होणार आहे. येत्या काळात इंटरनेट सेवेतील गणिते बदलण्याची शक्यता आहे. स्टारलिंकच्या आगमनामुळे देशातील डिजिटल पायाभूत सुविधांना चालना मिळेल. ही सेवा ग्राहकांना जलद आणि कार्यक्षम इंटरनेट अनुभव देईल. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्येही इंटरनेट पोहोचण्यास मदत होईल.