Beacon Light Controversy | Pimpri Chinchwad: कंत्राटी अधिकाऱ्याच्या गाडीवर 'दिवा', आयुक्तांवर मेहरबानीचा सवाल
पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ओमप्रकाश भईवाल हे कंत्राटी अधिकारी असून, त्यांच्या गाडीवर पोलिसांच्या गाडीचा दिवा लावून फिरत असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे, ओमप्रकाश भईवाल यांच्या पदाला शासन मान्यताच नाही, अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासन विभागाने दिली आहे. आपत्तीजन्य परिस्थितीत यंत्रणा आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून त्यांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, कंत्राटी अधिकारी असतानाही त्यांना अशा दिव्याचा वापर करण्याची कोणतीही अधिकृत मान्यता नाहीये, असं प्रशासन विभागाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ओमप्रकाश भईवाल कोणत्या अधिकारात या दिव्याचा वापर करत आहेत आणि महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग त्यांच्यावर एवढे मेहरबान का आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. "त्यांना याप्रकारची मान्यता नाहीये" असे प्रशासन विभागाने म्हटले आहे. या प्रकारामुळे शहरात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.