TOP 25 Superfast News : 14 OCT 2025 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha

Continues below advertisement
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दस्त नोंदणीसाठी क्षेत्रीय मर्यादेची अट रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 'कोणत्याही मुद्रांक कार्यालयात दस्त नोंदणी शक्य' असल्याचं महसूलमंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीसाठी आता विभागीय मर्यादेचा अडथळा येणार नाही. दुसरीकडे, पुण्यात मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलच्या कारने सहा वाहनांना धडक दिल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकच्या पंचटीत युवकावर धारदार शस्त्रानं हल्ला झाला असून आरोपी फरार आहेत. सातारा तालुक्यात तेरा वर्षीय शाळकरी मुलीची निर्घृण हत्या झाली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबाराचे फोटो समोर आले आहेत. इस्रायल-हमास युद्ध संपल्याने गाजापट्टीत लोकांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola