Beed Morcha : हिंदू मोर्चात राजकीय नाट्य, आमदार संग्राम जगतापांची माघार

Continues below advertisement
अहमदनगरमध्ये (Ahmednagar) सायंकाळी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयापासून सकल हिंदू समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि मिलिंद एकबोटे (Milind Ekbote) सहभागी होणार असल्याची माहिती आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे या मोर्चाला आता उपस्थित राहणार नाहीत', ही बातमी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या मोर्चाच्या माध्यमातून विविध हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत आहेत. मात्र, ऐनवेळी आमदार जगताप यांनी माघार घेतल्याने या मोर्चाला राजकीय वळण लागले आहे. यापूर्वीही संग्राम जगताप यांनी अशा मोर्चांमध्ये सहभाग घेतला होता, त्यामुळे त्यांच्या यावेळच्या अनुपस्थितीमागे वरिष्ठ नेत्यांचा दबाव असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola