ABP News

ST Workers Strike : एसटी संपाचा आज सातवा दिवस, अनिल परब यांच्या घरावर आज मोर्चा ABP Majha

Continues below advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सातवा दिवस आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी ठाम असणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन आणखी तीव्र होणार आहे. आंदोलक कर्मचारी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर धडकरणार आहेत. संपकरी परिवहन मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढून संताप व्यक्त करणार आहेत. काल रात्री विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दर्शवला. दुसरीकडे वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. विविध डेपोतून शिवशाही बस मार्गस्थ झाल्यात. या बसेसना पोलीस संरक्षणही देण्यात आलं. तसंच खासगी बसचालकांची मदत घेऊनही एसटी सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्र्यांनी दिलंय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram