ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात उच्च न्यायालयच्या निर्णयकडे आज राज्याचं लक्ष
Continues below advertisement
ऐन दिवाळीत राज्यातल्या 50 हून अधिक एसटी डेपोमध्ये कामबंद आंदोलन सुरु आहेत. अशातच आज एसटीच्या संपासंदर्भात होणाऱ्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केलीय, असं असलं तरी काल राज्यभरातल्या अडीचशेपैकी जवळपास 59 एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करु नये असा सवाल उच्च न्यायालयानं विचारला होता. एसटीला राज्य सरकारमध्ये विलिन करावं अशी एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी कामबंद आंदोलन सुरु आहे..
Continues below advertisement