ST Strike : एसटीच्या कर्मचाऱ्यांचं अनोखं आंदोलन, बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान

कोल्हापुरातील एसटीच्या कर्मचाऱ्यांचा आजचा दहावा दिवस आहे. आजच्या दिवशी कोल्हापुरातील कर्मचाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. रक्तदान शिबिर आयोजित करून सरकारला विनंती केली आहे की, आमचे रक्त घ्या पण आम्हाला सरकारमध्ये विलीन करा. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आले. किमान आतातरी सरकारला जाग येऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या असे आवाहन या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आले...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola