ST Worker Strike: कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची चिन्ह, थोड्याच वेळात नेते तज्ञांशी चर्चा करणार ABP Majha
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा प्रस्ताव सरकारनं दिल्यानंतर एसटीचा संप मिटण्याची चिन्हं असताना आज आझाद मैदानात आंदोलक आणि नेत्यांमध्ये नाराजीनाट्य रंगलं. काही नेते आंदोलकांना भडकावत असल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत आंदोलनस्थळावरून निघाले. पण आंदोलक कामगारांनी त्यांना रोखलं. दरम्यान, तज्ज्ञांशी चर्चा करून त्यानंतर सरकारबरोबर चर्चेसाठी जाणार असल्याचं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.
Continues below advertisement