ST Worker Strike: निलंबीत एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस, 7 दिवसांची मुदत ABP Majha
Continues below advertisement
बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची... संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर अखेर राज्य सरकारकडून कठोर कारवाई करण्यास सुरुवात झालीय. निलंबित एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यास सुरुवात झालीय...तर कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया एसटी महामंडळानं हाती घेतली आहे... सुमारे १० हजार कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. याबाबत ७ दिवसांत म्हणणं न मांडल्यास कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात येईल अशी माहिती एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. दरम्यान, कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांवरही बडतर्फीचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यामुळं संपकरी कर्मचारी काय भूमिका घेतात? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Continues below advertisement
Tags :
State Government St St Corporation Reasons Contact Strict Action For Employees Show Notice Bad Towards