ST Worker Strike: गुणरत्न सदावर्तेंमुळे संप चिघळला- कृती समिती ABP Majha
पोटाला कोणतीही जात, धर्म नसतो, त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन एसटी कामगारांच्या कृती समितीने केले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी संघटनांच्या कृती समितीशी बैठक झाली. त्यानंतर कृती समितीच्या विविध सदस्यांनी आपली भूमिका मांडली. आजच्या या बैठकीत आमच्या शंकांचे निरसण झाले आहे. तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना निवडणं ही आमची चूक होती, असे देखील कृती समितीच्या सदस्यांनी सांगितले.
Tags :
Congress Ncp Sharad Pawar TRANSPORT ST Workers Role Minister Anil Parab Action Committee Various Members