ST Worker Stike : कामावर रुजू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारीत वेतनवाढीनुसार पगार होणार
आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी... प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सामंजस्याची भूमिका घेत कामावर हजर राहिलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना आज सुधारित वेतनवाढीनुसार पगार मिळणार आहे. राज्यातील जवळपास १९ हजार एसटी कर्मचाऱ्यांचा सुधारित वेतनवाढीनुसार आज पगार होणार आहे. तर संपकरी कर्मचाऱ्यांना मात्र पगाराला मुकावं लागणार आहे. संपकऱ्यांवर मेस्मा कारवाईला सामोरं जावं लागू शकतं, अशी सध्याची परिस्थिती आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..