ST Strike Court Hearing : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज उच्च न्यायालयात सुनावणी

Continues below advertisement

गेले 48 दिवस सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीवर न्यायालयानं नेमलेली त्रिसदस्यीय समिती प्राथमिक अहवाल आज सादर करणार आहे. समितीचा अहवालानंतर न्यायालयाचा निर्णय सरकारला मान्य असेल अशी भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी आधीच जाहीर केलीय. या पार्श्वभूमीवर समितीच्या अहवालात काय मुद्दे असतील आणि न्यायालय त्यावर काय निर्णय देईल याकडे राज्यभरातले एसटी कर्मचारी आणि प्रवाशांचं लक्ष लागलं आहे. सुनावणीपूर्वी मंत्री सुभाष देसाई आणि अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यात चर्चा होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram