ST Strike : कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह बंद, सरकारची एसटी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई
Continues below advertisement
एसटी प्रशासनाकडून संपाविरोधात कारवाईला सुरुवात झालीय. ठाण्यातील खोपट डेपोमधील कर्मचाऱ्यांचे विश्रांतीगृह बंद करण्यात आलंय. इथं काम करणाऱ्या आणि आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आपले साहित्य घेऊन बाहेर काढण्यात आलंय. खोपट डेपो मॅनेजर यांनी दोन्ही विश्रांतीगृहांना टाळं ठोकलंय. त्यामुळे सर्व एसटी कर्मचारी रस्त्यावर आलेत. ड्युटीवर असताना विश्रांतीगृहच या कर्मचाऱ्यांचे घर असते तेच बंद केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप दिसून आला.
Continues below advertisement