MSRTC : एसटीचं राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत आज सुनावणी
Continues below advertisement
एसटी कर्मचाऱ्यांच्या आजवर सर्वाधिक काळ चाललेल्या संपावर उच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी आहे. एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण करावं या मागणीवर राज्य सरकारच्या समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलाय. त्यावर आज सुनावणी आहे. या अहवालात काय शिफारशी आहेत याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय. आपल्या या मागणीसाठी एसटीचे कर्मचारी 100 दिवसांहून अधिक काळ संपावर आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाचं तब्बल 1600 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. संपाचा तिढा कायम असताना कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या मागणीवर न्यायालयात काय निर्णय होणार याकडे कामगारांबरोबरच प्रवाशांचंही लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Msrtc St Bus St ताज्या बातम्या ST Strike Anil Parab ST Workers ताज्या बातम्या Abp Maza Live ST Protest Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News