ST Protest : विलिनीकरण झाल्याशिवाय एकही आंदोलक जागचा हलणार नाही, संपाची मुदत संपूनही आंदोलक ठाम
संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी अजित पवारांची दिलेली मुदत आज संपतेय. आज कामावर हजर न झाल्यास या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार असं अजित पवार यांनी सांगितलंय. एसटी कर्मचारी 27 ऑक्टोबर पासून संपावर आहेत. परिवहनमंत्री अनिल परब यांनी ७ ते ८ वेळा अल्टीमेटम दिला आहे. आजपर्यंत ३३ हजार १३५ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.