ST Protest Hearing : एसटी महामंडळाचा संप बेकायदेशीर, वांद्रे कामगार न्यायालयाचा निर्णय

Continues below advertisement

ST Protest : मागील अडीच महिन्यांपासून सुरू असणारा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा मुंबईतील कामगार न्यायालयाने दिला आहे. एसटी महामंडळाकडून दाखल केलेल्या तक्रार अर्जावर वांद्रे येथील कामगार न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्याचा परिणाम कामगारांवर होणाऱ्या कारवाया आणि संपावर होणार आहे.
एसटी ही लोकोपयोगी सेवा असताना देखील सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस न दिल्याचं कोर्टानं म्हटलंय. औद्योगिक विवाद कायद्यानुसार लोकोपयोगी सेवा असल्यास सहा आठवडे अगोदर संपाची नोटीस देणं बंधनकारक आहे. परंतु एसटी महामंडळातील सध्या सुरू असलेल्या संपात कोणतीही कायदेशीर नोटीस देण्यात आलेली नव्हती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram