ST मेगाभरतीच्या तयारीत, 11 हजार कंत्राटी कामगार भरती होणार 48 हजार कर्मचारी कामावर फिरकलेच नाही

एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिलेला नववा अल्टीमेटम काल संपला. मात्र या अल्टिमेटमपर्यंत एसटीचे तब्बल 48 हजार कर्मचारी कामावर फिरकलेच नाहीत. मात्र संपाला ब्रेक न लागल्यानं सरकार आता संपकऱ्यांवर कारवाईच्या तयारीत आहे. या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई होण्याची शक्यता आहे. तिकडे एसटी महामंडळही मेगाभरतीच्या तयारीत असल्याचं दिसतंय. कारण लवकरच एसटी महामंडळ 11 हजार कंत्राटी चालक, वाहकांची भरती करणार आहे. तसंच लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर भाडेतत्त्वावर बसेस घेऊन चालवण्यात येणार असल्याची माहिती आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola