गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर CIDCO भूखंड , सदनिका आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची महायोजना
Continues below advertisement
नव्या वर्षात मुंबईकरांसाठी गुड न्यूज आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिडकोकडून सदनिका, भूखंड आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्रीची महायोजना जाहीर करण्यात येणार आहे. खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी नोड्समध्ये या विविध योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. योजनेतील वाणिज्यिक गाळ्यांची आणि भूखंडांची विक्री ई-लिलाव प्रक्रियेद्वारे पार पडणार आहे.
मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाणिज्यिक गाळ्यांमुळे व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यास मदत होणार आहे.
Continues below advertisement