ST Mahamandal : एसटी महामंडळाचं राज्य विलिनीकरण करण्याच्या मागणीबाबत आज महत्त्वाची सुनावणी
ST Mahamandal Hearing : एसटी महामंडळाच्या विलिनीकरणाबाबत आज उच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. याकडे संपकऱ्यांचं लक्ष लागलंय. यासाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहे.यासाठीच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला शंभर दिवस उलटूनही अद्याप तोडगा निघाला नाही. आज उच्च न्यायालयात यासंदर्भात सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयात निकाल कर्मचाऱ्यांविरोधात लागल्यास कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. अशातच मंत्रालय, वांद्रे येथील अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza ST Mahamandal Abp Maza Live ST Merger Abp Maza Marathi Live Live Tv