ST Strike : एसटी महामंडळ आक्रमक, 55 हजार संपकऱ्यांना नोटीस

ST Workers Strike : मागील अडीच महिन्यापासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अद्यापही सुरू असून आता महामंडळाने आक्रमक भूमिका घेतली आहे. वेतनवाढीची घोषणा केल्यानंतरही फार कमी प्रमाणात कर्मचारी रूजू झाले. त्यामुळे आता एसटी महामंडळाने वाहतूक सुरू करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एसटी महामंडळातून निवृत्त झालेल्या चालकांची करारपद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. तर, दुसरीकडे 55 हजार संपकऱ्यांना नोटीस बजावली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola