ST Employees Salary | एसटी कर्मचाऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी पगार; परिवहन मंत्र्यांचे आदेश
एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. त्यांना ऑगस्ट महिन्याचा पगार याच महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्र्यांनी राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे गणेश चतुर्थीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार देण्याचे आदेश दिले आहेत. अधिकाऱ्यांना आजच वित्त मंत्रालयाकडे कर्मचारी पगाराची फाइल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, वित्त विभागाशी बोलणी करून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी एक ते दोन दिवसांत हस्तांतरित करण्याची विनंती करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर वित्त विभागाकडून सोमवारपर्यंत निधी उपलब्ध झाला, तर एसटी कर्मचाऱ्यांचे पगार सोमवार किंवा मंगळवारी होतील. दर महिन्याला उशिरा पगार मिळणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना या महिन्यात गणेश चतुर्थीमुळे लवकर वेतन मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.