Home Guard Death| बीडमध्ये प्रेम त्रिकोणातून Home Guard महिलेची हत्या, मैत्रिण ताब्यात

बीडमध्ये एका Home Guard महिलेच्या हत्येने खळबळ उडाली आहे. अयोध्या वरकट असे मृत Home Guard महिलेचे नाव असून, त्या गेवराई येथे Home Guard म्हणून कार्यरत होत्या. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तपास करत आरोपी वृंदावनी फरताळे हिला ताब्यात घेतले आहे. मयत अयोध्या वरकट आणि आरोपी वृंदावनी फरताळे या दोघी मैत्रिणी होत्या. दोघींचे एकाच तरुणावर प्रेम होते. अयोध्या वरकट ही प्रेमाच्या मध्ये अडसर ठरत असल्याने, वृंदावनी फरताळेने तिला घरी बोलावून तिची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह परिसरातील नाल्यात फेकून देण्यात आला. या घटनेने बीड शहर हादरले आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी महिलेला अटक केली आहे. या घटनेमुळे प्रेम प्रकरणातून घडलेल्या गुन्हेगारीचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola