कर्मचाऱ्यांनी कामावर यावं कोणी अडवणूक करू नये, ST महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांचं आवाहन
Continues below advertisement
विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. वारंवार आवाहन करुनही कर्मचारी कामावर येत नाहीय. त्यामुळं आता हा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरु केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आगारातून खासगी बस, शालेय बस आणि वडाप सोडल्या जात आहेत. नाशकातूनही पुणे आणि धुळ्याच्या दिशेनं शिवशाही बस मार्गस्थ झाल्या आहेत. यासाठी शिवशाही बसेसना पोलीस संरक्षण देण्यात आलंय.
पुण्यातून नाशिक आणि मुंबईसाठी खासगी बसेस रवाना करण्यात आल्या आहेत. याशिवाय मुंबई सेंट्रल डेपोतून पहिली मुंबई- सातारा एस टी बाहेर पडली आहे. यासाठी खासगी बसचालकांची मदत घेतली आहे. दरम्यान, अनेक कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना संरक्षण दिले जाईल, असे आश्वासनही परिवहन मंत्र्यांनी दिलंय.
Continues below advertisement