ST Bus Profit in Diwali 2023 : दिवाळीत दरवाढीनंतरही प्रवाशांचा मोठा प्रतिसाद
Continues below advertisement
एसटी बसने गेल्या १५ दिवसांत ३२८ कोटींची कमाई केलीय. दिवाळी हंगामी दरवाढीनंतरही प्रवाशांचा एसटी बसला मोठा प्रतिसाद मिळाला. दिवाळीत बाहेरगावी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक होती. भाऊबीजेच्या दिवशी एसटीला ३१ कोटी ६० लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी २२ ऑक्टोबरला भाऊबीजेला एसटीला ३० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
Continues below advertisement