SSC Exam Rule : परीक्षेसाठी वेळेत केंद्रावर पोहचा, परीक्षा केंद्रावर उशीरा आल्यास NO ENTRY

Continues below advertisement

दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी आज घरातून निघताना थोडं लवकर निघा... तुम्हाला परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचावं लागणार आहे... कारण वेळेत पोहोचला नाहीत तर तुमचं वर्ष वाया जाऊ शकतं. पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात येणार आहे. 
पेपरला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यामुळं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याआधी उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थितीत परीक्षेला बसण्यासाठी परवानगी दिली जात होती. मात्र आता पेपर सुरू झाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत पेपरला बसण्याची परवानगी विद्यार्थ्यांना दिली जाणार नाही. म्हणजेच सकाळच्या सत्रात साडेदहानंतर आणि दुपारच्या सत्रात तीन वाजल्यानंतर विद्यार्थी केंद्रावर आल्यास त्याला प्रवेश नाकारला जाणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram