Milk Price Hike : दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता अधिक मोबदला मिळणार , दुधाच्या किमतीत वाढ : ABP Majha
दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता अधिक मोबदला मिळणार आहे, कारण महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज दुधाच्या खरेदीत तीन रुपये तर विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आलीय.. दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला.. महानंद, चितळे, गोवर्धन, कात्रज इत्यादी सहकारी आणि खासगी दूध व्यावसायिकांचे प्रतिनिधी या बैठकीत उपस्थित होते. दूध पावडर आणि लोणी यांचे वाढलेले दर त्यामुळे दूधाची वाढती मागणी व कमी उत्पादनामुळे हा निर्णय घेण्यात आलाय.. इंधन दर, आणि पशू खाद्य महागल्याचेही परिणाम दुधाच्या किमतीवर दिसून आले आहेत.