Srilanka Crisis : सोन्याची लंका कंगाल, जनता रस्त्यावर; श्रीलंकेवर आर्थिक संकट ABP Majha

Continues below advertisement

कधीकाळी सोन्याची लंका अशी बिरुदावली मिरवणारी श्रीलंका आता स्वतःच लंकेची पार्वती होण्याची वेळ आलेय. आर्थिक आणीबाणीमुळे श्रीलंकेत अस्थिरता, अराजक माजलंय. श्रीलंकेवर सध्या अब्जावधींचं कर्ज आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठीही पैसे नाहीयेत.. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे महागाईनं त्रस्त जनता रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनं करत आहेत... काल श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिला होता. आता निदर्शकांनी पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांच्याही राजीनाम्याची मागणी केलेय. श्रीलंकेत सध्या रुग्णालयातही वीज नाहीये... रेल्वे-बस नेटवर्क ठप्प आहे, एवढंच काय तर महागाईमुळे लोकांना खावं काय  हाही प्रश्न पडलाय. या अराजकासाठी श्रीलंकेच्या जनतेनं राजपक्षे परिवाराला जबाबदार धरलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram