SPOOF PAYTM: पेटीएम अ‍ॅपमधून फसवणूक, तिघे अटकेत ABP Majha

Continues below advertisement

सध्या डिजिटलायझेशन आणि ऑनलाईन पेमेंटला प्रोत्साहन दिलं जातं. ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक अॅप उपलब्ध आहेत. मात्र पेटीएम अॅप वापरत असाल तर सतर्क राहा. कारण बनावट पेटीएमसारख्या दिसणाऱ्या अॅपमधून फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. पेटीएम सारख्या दिसणाऱ्या Spoof पेटीएम अॅपमधून ही टोळी फसवणूक करत होती.  साकीनाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेलमध्ये भाड्याने राहण्यासाठी या तीन लोकांनी रूम बुक केली होती. याचं बिल पन्नास हजारापर्यंत आलं. यावेळी या तिघांनी हॉटेल मॅनेजरला Spoof पेटीएम अॅपमधून पेमेंट केल्याच्या सांगितले आणि निघून गेले. यासंदर्भात हॉटेल मालकाने बँकेत चौकशी केली. तसंच यूट्यूबवर Spoof पेटीएम अॅपच्या फसवणुकीचा व्हिडीओ पाहिला असता आपली फसवणूक झाल्याचे हॉटेल मालकाच्या लक्षात आलं. या संदर्भात हॉटेल मालकानं पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींचं लोकेशन ट्रेस करुन अवघ्या दोन तासांत तीन आरोपींना बेड्या ठोकल्यात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram